तसे तर झाडू एक सामान्य वस्तू आहे ज्याने आपण आपले घर स्वच्छ करतो परंतु शास्त्रांमध्ये या वस्तूचा म्हणजे झाडूचा संबंध महालक्ष्मी मातेच्या कृपेशी जोडला गेला आहे झाडू आपल्या घरातील कचऱ्याच्या रूपातील असणारी दरिद्रता घरातून बाहेर काढते व साफसफाईच्या रूपात महालक्ष्मीची कृपा आपल्याला मिळवून देते ज्या घरात स्वच्छता असते तेथे देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते असे म्हटले जाते देवी लक्ष्मीला जर प्रसन्न करायचे असेल तर कोणत्याही एका मंदिरात तीन झाडूनचे दान करावे

परंतु हे दान गुप्तदान म्हणून करायचे आहे हे कोणाला सांगू नये व कोणासमोरही झाडू ठेवू नये एक दिवस अगोदर तीन झाडू घरी आणून ठेवावेत व दुसर्‍या दिवशी पहाटे पहाटे कोणाला दिसणार नाही अशा वेळी तीनही झाडू मंदिराच्या दरवाजात ठेवून निघून यावे यामुळे आपल्या आर्थिक परिस्थितीत नक्कीच सुधारणा होते ही प्रथा खूप प्राचीन काळापासून चालत आलेली आहे प्राचीन काळी लोक मंदिरात झाडूचे गुप्तदान करत असत सकाळी ब्राह्ममुहूर्तावर मंदिरात झाडू ठेवावे

हे काम करताना एखादा विशेष दिवस निवडावा म्हणजेच एखादा सण उत्सव ज्योतिषातील शुभयोग किंवा या दिवशी नाही जमले तर एखाद्या शुक्रवारी हा उपाय करावा हे काम कोणालाही न सांगता गुप्त स्वरूपात करावे आपल्या शास्त्रांमध्ये गुप्तदानाचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे झाडू मुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते जर घरातील कचरा धूळ जाळे जळमटे व्यवस्थित रित्या स्वच्छ केले नाहीत तर घरातील वातावरण नकारात्मक बनते झाडू मुळे ही सर्व घाण आपल्या घरातून बाहेर निघते

म्हणजेच नकारात्मकता आपण बाहेर काढतो आणि घरातील वातावरण सकारात्मक बनते नकारात्मक वातावरणात राहणाऱ्या व्यक्तींचे विचारही नकारात्मकच होऊ शकतात कारण आपण जशा वातावरणात राहतो तसाच प्रभाव आपल्यावर पडतो आणि याचाच प्रभाव घरातील आर्थिक स्थिती वर पडू शकतो घरात जर स्वच्छता ठेवली वेळोवेळी साफसफाई केली तर अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत नाहीत व अशा समस्यांना सामोरेही जावे लागत नाही तसेच देवी-देवतांची कृपा आपल्याला प्राप्त होते

शास्त्रामध्ये झाडूला देवी लक्ष्मीचे रूप मानण्यात आलेले आहे म्हणून कोणत्याही प्रकारे झाडूचा अनादर करू नये आजही अनेक लोक झाडूला पाय लागल्यानंतर झाडूला नमस्कार करतात झाडूला दरवाजामागे ठेवणे जास्त शुभ असते झाडू कधीही उभा ठेवू नये हा अपशकून मानला जातो ज्यावेळी आपण नवीन घरात प्रवेश करणार असतो तेव्हा नवा झाडू घेऊन घरामध्ये प्रवेश करावा हा शुभशकुन मानला जातो यामुळे आपल्यावर देवी-देवतांची कृपा होते व नवीन घरामध्ये सुख-समृद्धी येते

आणि धनधान्याची बरकत येते जर घरामध्ये एखादे लहान बालक अचानक हातात झाडू घेऊन घर झाडायला लागले तर असे समजावे की एखादा पाहुणा अचानकपणे आज आपल्या घरी येणार आहे सूर्यास्ताच्या वेळी कधीही घर झाडू नये असे केल्याने घरात दरिद्रता येते घराची साफसफाई सूर्यास्तापूर्वीच करून घ्यावी कारण सूर्यास्ताच्या वेळी देवी लक्ष्मी पृथ्वी वर फिरत असते व या वेळी आपण जर घर झाडले तर देवी लक्ष्मीला घराबाहेर काढल्यासारखे होते

म्हणून घराची स्वच्छता नेहमी सूर्यास्तापूर्वीच करावी जेव्हा झाडू चे काम संपते तेव्हा झाडू कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावा बाहेरच्या व्यक्तीला जर आपल्या घरातील झाडू दिसला तर घरात भांडण तंटे व वादविवाद होतात असे वास्तुशास्त्रात म्हटलेले आहे झाडूला कधीही पाय लावू नये झाडूला पाय लावणे म्हणजेच झाडूचा अपमान करणे होय आणि पर्यायाने देवी लक्ष्मीचा निरादर करणे होय म्हणून झाडू नेहमी लपवून ठेवावा असे केल्याने घराला बरकत येते

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *