तुमच्या देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर तुम्ही ही एक चूक अजिबातच करू नका भरपूर भक्तांचा स्वामी सेवेकरांचा एक प्रश्न सारखा विचारला जात होता तो म्हणजे आमच्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे आणि आम्ही ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवघरात अशीच ठेवून दिली आहे आणि इतर देवाप्रमाणे आम्ही तिची पूजा अर्चना करत आहे

तर ही सगळ्यात मोठी चूक असते अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही अन्य देवांसारखी ठेवली जात नाही तिला ठेवण्याची एक विशेष पद्धत असते तर त्या पद्धतीनुसार तुम्ही त्या मूर्तीला घरात स्थापन करायला पाहिजे जेव्हाही तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती विकत घेता तेव्हा तिच्याबरोबर एक वाटी सुद्धा विकत घ्यायची असते छोटीशी वाटी असते ज्यामध्ये ती अन्नपूर्णा माता ठेवली जाते बसवता येते

अशी एक वाटी असते किंवा वाटी तुम्ही घेतली नसेल तर तुम्ही घरातूनच एखादी छोटीशी वाटी किंवा ताटली घेऊन त्यामध्ये तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करू शकता आता ही कशी करावी तर याचीही खूप सोपी पद्धत आहे ती म्हणजे तुम्ही त्या वाटीमध्ये किंवा त्या ताटलीमध्ये तांदूळ पूर्ण त्यामध्ये भरून घ्या सपाट करून घ्या आणि त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवा

आणि ते देवघरात स्थापन करा कारण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही धनाची नाही धान्याची देवी आहे म्हणून धान्याच्या देवीला धान्यामध्येच ठेवले जाते म्हणून तांदुळामध्ये त्या देवीला ठेवण्याची पद्धत प्रक्रिया असते आणि त्यानुसारच आपण त्या देवीची पूजा करावी आता विशेष प्रश्न येतो तो म्हणजे ते तांदूळ जे आपण ठेवतो ते केव्हा बदलावे तर ते तांदूळ काही लोक एक दिवसाआड बदलतात

म्हणजे आज ठेवले तर उद्या नाही बदलत परवा बदलतील काही लोक रोज बदलतात आज ठेवलेले उद्या बदलतील उद्या पुन्हा नवीन ठेवतील असं करतात आणि काही लोक हे दर आठवड्याला ते तांदूळ बदलतात म्हणजे जर तुम्ही सोमवारी त्या वाटीत तांदूळ ठेवलेले आहेत तर पुढच्या सोमवारी दुसरे तांदूळ ठेवतात

आणि ते वाटीतले तांदूळ पक्षांना आपण खाऊ घालू शकतो किंवा पक्षांना टाकू शकतो तर तुमच्या घरात सुद्धा अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर तुम्ही ही या पद्धतीने तिची स्थापना आपल्या घरात करू शकता

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.