लवकरच येत आहे आपल्या सर्वांचा आवडता दसरा दसरा हा एक असा शुभमुहूर्त आहे तुम्हाला या दिवशी गाडी घ्यायची असेल तर घ्या जमीन शेत प्लॉट खरेदी किंवा नवीन एखादी सोन्याची वस्तू नवीन कुठली वस्तू हवी असेल ती वस्तू तुम्ही अगदी डोळे झाकून मुहूर्त न बघता घेऊ शकता

याशिवाय प्रत्येकांना सोने घर गाडी जमेल असे नाही फ्रीज वगैरे या सर्व गोष्टी जर या दिवशी घेतल्या तर त्या शुभ मानल्या जातात पण आज आपण अशा काही वस्तू जाणून घेणार आहोत या वस्तू आपल्या घरामध्ये असायला हव्यात आणि आपली कुलदेवी आणि आपले सर्व देव नक्कीच यामुळे प्रसन्न होतील

चला तर जाणून घेऊया कोणते आहेत त्या गोष्टी त्यातील पहिली गोष्ट कमळगट्टा ची माळ म्हणजे कमळाच्या बिया पासून बनवलेली ही माळ लक्ष्मी मातेला अतिशय जास्त प्रसन्न आहे ही माळ जर तुम्ही लक्ष्मीला घातली आणि रोज याने लक्ष्मीचा मंत्र जप केला तर तुमच्याकडे लक्ष्मी अखंड नांदेल लक्ष्मीला घाला

किंवा जर तुम्ही श्रीयंत्रावर ही माळ गुंडाळून ठेवली तरीही तुमच्या घरामध्ये लक्ष्मी चा अखंड वास होतो मात्र कमळगट्टा च्या माळेला कधीही पाण्यात घालू नये कारण ते एक प्रकारचे बीज आहे त्यामुळे ते खराब होण्याची किंवा त्याला बुरशी येण्याची शक्यता असते

म्हणून जर तुम्ही ती माळ घरी आणली तर ति माळ सिद्ध करण्यासाठी त्याच्यावर फक्त तुम्हाला गंगाजल शिंपडायच आहे आणि एक दिवस ती माळ तुम्हाला कुंकुवा मध्ये किंवा अष्टगंधा मध्ये ठेवायचे आहे आणि मग त्यानंतर त्यावर तुम्हाला 108 वेळा श्री माता लक्ष्मी किंवा जय माता लक्ष्मी किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे या मंत्रांचा जप करून ती मला सिद्ध करावयाची आहे

पुढची गोष्ट आहे श्रीयंत्र यांच्या घरामध्ये श्रीयंत्र नाही त्यांनी दसऱ्याच्या आधी ते श्रीयंत्र आणून ठेवा आणि दसऱ्या दिवशी त्याची स्थापना करायची आहे हे यंत्र घरामध्ये असणे अत्यंत महत्त्वाचे आहे ज्या घरांमध्ये हे श्रीयंत्र असते त्या घराची प्रगती भरभराट कधीही थांबत नाही

असे म्हंटले जाते हे यंत्र तुम्हाला दसऱ्या दिवशी सकाळी व्यवस्थित त्याचे पंचोपचार पूजन आधी पाण्याने मग पंचामृताने मग पुन्हा पाण्याने असे स्वच्छ त्याचे अभिषेक करून मग श्रीसूक्त पुरुष सूक्त असे म्हणत तुम्हाला त्याचा अभिषेक करायचा आहे व नंतर एखाद्या लाल कपड्यावर किंवा पैशांमध्ये एक शंभर ची नोट घ्या

त्याला पिरामीड चा आकार द्या एका छोट्या ताटलीमध्येती नोट ठेवा आणि त्यावर श्री यंत्र स्थापन करा आणि या यंत्रावर कमळगट्टा ची माळ ठेवा आणि यानंतर तुमच्या घरामध्ये पैशांची आर्थिक आवक एवढी वाढेल याचा बदल तुम्हाला स्वतःला दिसून येईल

श्री यंत्राची रोजच्यारोज पूजा होणे आवश्यक आहे शुक्रवारी एक दिवस तुम्ही श्रीयंत्राचे अभिषेक करू शकता त्यानंतरची पुढची गोष्ट आहे पारद शिवलिंग किंवा स्फटिक शिवलिंग ज्यांच्या घरांमध्ये असते त्यांच्या घरावर सुद्धा माता लक्ष्मी आणि भगवान शंकरांची कायम कृपादृष्टी असते

भगवान शंकराची कृपा आपल्यावर राहिल्यावर आपल्या आरोग्य कधीही बीघडत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पारद शिवलिंगावर ज्या घरांमध्ये रोजच्या रोज अभिषेक केला जातो इथे आर्थिक सुबकता प्रसन्नता शांतता भरभराट भरपूर आणि कायम राहते

म्हणून पारद शिवलिंग किंवा स्फटिक शिवलिंग तुम्हाला या दिवशी आणायचे आहे पुढची गोष्ट आहे चांदीचे बेलपत्र या दिवशी तुम्हाला चांदीचे बेलपत्र आणून त्याच्या हळदीकुंकू लावून पंचोपचार पूजा करून उजव्या हातात घेऊन माता लक्ष्मी चा कोणताही मंत्र 108 वेळा म्हणून

लाल कपड्यांमध्ये घालून तुम्हाला हे बेलपत्र तिजोरीमध्ये ठेवायचा आहे लक्ष्मी पूजेला पुन्हा हे बेल पत्र काढून तुम्हाला याची पूजा करायची आहे यामुळे तुमच्या तिजोरीमध्ये मध्ये पैसा सोने जे काही आहे ते अखंड टिकून राहील पुढची वस्तू आहे दक्षिणावर्ती शंख हे जे दक्षिणावर्ती शंख आहे

ते धार्मिक वस्तूंच्या दुकानांमध्ये सहजरीत्या उपलब्ध होते वाजवण्याचा शंख आणि पूजेचा शंख हे दोन्ही नेहमी वेगळे असावेत दक्षिणावर्ती शंख व देवघरामध्ये असल्यामुळे घरांमध्ये कधीही इडापिडा बाधा करणी रोगराई आजार अकस्मित अपघात हे कधीही यापैकी कोणत्याही गोष्टी आपल्या सोबत घडत नाहीत

दक्षिणावर्ती शंखाचा आपलं असं महत्व आहे त्यामुळे तो घरामध्ये नक्की असावा शंखाला लक्ष्मीचा भाऊ मानले जाते आणि हासुद्धा समुद्रातूनच प्रकट होतो त्यामुळे ही गोष्ट देखील आपल्या घरामध्ये असणे आपल्या देवपूजेमध्ये असणे

अत्यंत महत्त्वाचे आहे पुढची गोष्ट आहे घंटा जर तुमच्या घरामध्ये घंटा नसेल तर अवश्य आणा कारण रोजच्या पूजेमध्ये रोजच्या रोज घंटानाद करणे आवश्यक आहे त्यामुळे सुद्धा तुमच्या घरांमध्ये करणीबाधा बाहेरच्या अडचणी किंवा नजर लागणे अशा गोष्टी घडत नाहीत

लक्ष्मीची मूर्ती नसेल अन्नपूर्णेची मूर्ती नसेल गणपतीची मूर्ती नसेल हेदेखील तुम्ही या दिवशी अवश्य आणू शकता आपल्या श्री स्वामी समर्थांची मूर्ती सुद्धा तुम्ही या दिवशी नक्की आणू शकता या दिवशी तुम्हाला सात कवड्याची पूजा सुद्धा करायची आहे

सात गोमती चक्र आणून त्याची सुद्धा तुम्हाला विधीवत पूजा करायची आहे विधिवत म्हणजे एकदा पाण्याने मग दुधाने मग गंगाजलाने अशाप्रकारे धुऊन त्याला हळदीकुंकू पांढरी फुले किंवा लाल फुले वाहून दिवा अगरबत्ती साखर दाखवून विधिवत पुजा करायची आहे

ही पुजा झाल्यानंतर हे सर्व एका पिवळ्या कापडामध्ये बांधून तुम्ही जर हे तुमच्या तिजोरीमध्ये ठेवले तरी सुद्धा माता तुमच्यावर अखंड प्रसन्न राहील यानंतर ची पुढची गोष्ट आहे मोरपंख किमान सात किंवा अकरा तरी मोरपंख आणून त्यांना एकत्रित करून देवघरामध्ये

किंवा देवघराच्या बाजुला जरी बांधून ठेवले तरीही तुमच्या घरावर कोणतीही करणे बादा कधीही होणार नाही कोणताही नजर दोष लागणार नाही आणि मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल मोर पंखा बद्दल असं म्हटलं जातं की जरी मोरपंख मोरा पासून बाजूला झाले तरीही त्यामध्ये जिवंतपणा असतो

म्हणून मोरपिसाला जास्त महत्व आहे काल सर्प दोष ज्यांना आहे त्यांनी तर अवश्य सोबत मोरपंख बाळगाव त्यामुळे त्यांचा दोष नाहीसा होतो चांदीचे लक्ष्मीचे नाणे या दिवशी आणणे आणि त्याची पूजा करणे आणि नंतर लक्ष्मी पूजा दिवशी पुन्हा त्याची पूजा करणे हे सुद्धा शुभ मानले जाते पुढची वस्तू आहे

झाडू जोडीने झाडू आणून तुम्ही माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये दान करू शकता म्हणजे आदल्या दिवशी झाडू आणून ठेवायचे आणि दसऱ्याच्या दिवशी तुम्ही ते लक्ष्मी मातेच्या मंदिरा मध्ये जाऊन दान करायचे हे गुप्तदान तुमच्या आयुष्यामध्ये खूप जास्त बदल घडवून आणू शकते

किमान एक तरी सोन्याचा मणी तुम्ही या दिवशी नक्की खरेदी करावा जर तुम्हाला जमत असेल तर नाही तर आपण कितीतरी गोष्टी जाणून घेतल्या आहेत त्यापैकी कोणती एक वस्तू जरी तुम्हाला आणायला जमली तरी देखील तुम्ही आणा पण नक्की काहीतरी खरेदी करा

कारण या दिवशी केलेले खरेदी तुम्हाला लाभदायक ठरेल तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून

तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *