आपले घर हे आपले मंदिर असते आपल्या घरात अनेक देवी देवतांचा वास असतो ह्या देवी-देवतांनाच वास्तुशास्त्रा ने शुभ ऊर्जाप्रवाह असं म्हटलेला आहे आणि म्हणूनच आपल्या घरात देव पूजा चालू असताना मोठ्याने बोलणे वाद-विवाद करणे भांडणे करणे ह्या गोष्टी आपण शक्यतो टाळाव्यात. कर्कश आवाजातला संगीत सुद्धा देव पूजा चालू असताना आपण लावू नये.
मित्रांनो देव पूजा चालू असताना जर ही एक गोष्ट घडली तर लक्षात घ्या देवी देवतांचा आशीर्वाद आपणास प्राप्त झालेला आहे प्रत्यक्ष माता लक्ष्मी ने आपल्या घरात प्रवेश केला आहे. मित्रांनो आपल्या वास्तूत म्हणजे आपल्या घरात शक्यतो सकाळ-संध्याकाळ आपण सुगंधी धूप फिरवावा आणि त्या वेळी आपल्या कुलदेवता चे वास्तु देवतेचे आणि पितृ देवतेचे मंत्रांचा जप करावा.
ओम नमो कुलदेवताये नमः ओम नमो वास्तुदेवताये नमः ओम नमो पितृदेवताये नमः अशाप्रकारे आपले कुलदेवतस वास्तु देवतेस आणि पितृ देवतेस प्रसन्न करण्याचा प्रत्येकाने जर प्रयत्न केला तर ही दैवते प्रसन्न होतात आणि आपल्या वास्तूत चीर संपदा शांती समृद्धी मांगल्य प्रदान करतात वास्तुशास्त्रानुसार ज्या लोकांच्या वास्तुची भरभराट होत नाही किती ही महिनंत करा प्रगती होत नाही.
अशा लोकांनी दक्षिण दिशेकडे विशेष लक्ष पुरवावे या दक्षिण दिशेला पिवळ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करावा दारी असतील खिडक्या असते त्यांना बाहेरून पिवळा रंग लावावा जर परदे असतील तर हे परदे सुद्धा पिवळ्या रंगाचे केले तर अति उत्तम परिणाम प्राप्त होईल होतात. दक्षिण दिशे प्रमाणेच आपल्या वास्तूची पश्चिम दिशा म्हणजे ज्या दिशेला सूर्य मावळतो.
ह्या दिशेला आपण निळ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करा परदयांचा रंग निळसर ठेवा यामुळे होतं काय की आपल्या वास्तूतील ऊर्जा प्रवाह संतुलित राहतात आणि आपल्या वास्तुची भरभराट होण्यास मदत होते. मित्रांनो पश्चिम दिशेला आपण हिरवी झाडं किंव्हा रोप त्यांची चित्र किंवा अश्या हिरव्या रंगाचे फोटो झाडांचे फोटो भिंतींचा हिरवा रंग हिरव्या रंगाचा फर्निचर आणि हिरव्या रंगाचे परदे इत्यादी.
हिरव्या गोष्टी लावणं कटाक्षाने टाळावं कारण हिरवा रंग पश्चिम दिशेला असनं हा ऊर्जा प्रवाह खंडित करणारा मानला जातो. मित्रांनो आजचा आपला मुख्य विषय हा आहे की देव पूजा करता अशी कोणती गोष्टी जर घडून आली तर साक्षात लक्ष्मी ने आपल्या घरात प्रवेश केला आहे असं आपण मानावा मित्रांनो आपण पूजा करत असताना जर मधेच कुणी अतिथी आला सकाळची पूजा असो किंवा संध्याकाळची असो.
जर एखादा अतिथी एखादा पाहुणा जर तुमच्या घरात आला तर रागावू नका आपणा अतिथीचा स्वागत करा अगदी मनोभावे कारण हिंदू धर्म संस्कृतीत अतिथी देवो भव असे म्हटलेला आहे अतिथीला प्रत्यक्ष आपण देवाचा म्हणजे परमेश्वराचा दर्जा दिलेला आहे. आणि म्हणून ज्या घरात अतिथी आल्यानंतर लोक रागवतात लोकांचे कपाळावरती आठ्या पडतात अशा घरात लक्ष्मी कधीच नांदत नाही अशा घरात तिचा वास राहत नाही.
तर अशा या अतिथीचा आपण योग्य तो पाहुणचार करा त्याला खाण्यापिण्यास अवश्य द्या. मित्रांनो त्यातल्या त्यात जर सायंकाळची पूजा करतानां सायंकाळची दिवाबत्ती करतानां जर एखादी सुवासिनी स्त्री महिला एखादी सुवासिनी स्त्री जर आपल्या घरात आली तिने प्रवेश केला तर लक्षात घ्या त्या सुवासिनी स्त्रीच्या रूपात प्रत्यक्ष माता लक्ष्मीने देवी लक्ष्मीने आपल्या घरात प्रवेश केला आहे.
एखादी सुवासनी स्त्रीने सायंकाळची पूजा करताने आपल्या घरात येणे हे अत्यंत नशिबाचा आणि भाग्यशाली मानलं जातं अशा स्त्रीचा आपण यथोचित सत्कार करा मित्रांनो ह्या छोट्या-छोट्या गोष्टींचा जर आपण पालन केलं तर आपल्या घराची आपल्या वास्तूची भरभराट नक्की होईल.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.
जर आपले एखादे काम असेल तर ते काम होण्यासाठी खात्रीशीर उपाय सुचवा.किंवा लहाण मुलांचे अभ्यासात लक्ष लागण्यासाठी उपाय.