शारदीय नवरात्र सुरू आहेत जगत जननी माँ जगदंबेच्या नऊ रूपांच आपण पूजन करत आहोत अशावेळी प्रत्यक्ष माता-पार्वतीच्या घामापासून निर्मित बेलवृक्षाखाली काही छोटे छोटे उपाय आपण नक्की करा स्कंद पुराणांमध्ये असं सांगितलेलं आहे

की माता-पार्वतीच्या घामापासून बेल वृक्षाची उत्पत्ती झाली या बेलवृक्षांमध्ये प्रत्यक्ष ब्रम्हा विष्णू आणि महेश हे त्रिदेव वास करतात या बेल वृक्षाच्या मुळामध्ये ब्रह्मदेवांच वास्तव्य आहे ब्रह्मदेवांनीच या सृष्टीची उत्पत्ती केलेली आहे या बेलवृक्षाच्या खोडामध्ये या जगाचे पालन हार

भगवान श्रीहरी श्रीविष्णू वास करतात तर या बेल वृक्षाच्या फांद्यांमध्ये भगवान भोलेनाथ महादेवांचे वास्तव्य आहे नवरात्रीतील कोणत्याही दिवशी या बेलवृक्षाखाली काही छोटे छोटे उपाय केल्यास त्याचे फळ माताराणीच्या कृपेने माता जगदंबेच्या कृपेने तात्काळ प्राप्त होते

कोणत्याही स्वरूपाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपली मुले गुणवान आणि पराक्रमी संस्कारशील बनण्यासाठी आणि धनप्राप्ती अर्जित करण्यासाठी म्हणजेच धनसंचय पैसा यावा संपत्ती वैभव ऐश्वर्या निर्माण व्हावं यासाठी सुद्धा हे उपाय केले जातात

नवरात्रीतील नऊ दिवस या नऊ दिवसांपैकी कोणत्याही दिवशी आपण हे उपाय अगदी आवर्जून करून पहा अतिशीघ्ररीत्या त्या सर्वांचं फळ आपणास प्राप्त होत अनेकांना बेलाचे झाड माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगतो आपण भगवान शिव शंकरांच्या शिवलिंगावर ती म्हणजेच महादेवांच्या पिंडीवरती जी पाणी अर्पण करतो

की ज्याला तीन दले असतात जे तीन पानांचं जे एक पर्णपत्र जे आपण अर्पण करतो त्यालाच बेलपत्र असं म्हटलं जातं बेलाचे पान असं आपण म्हणतो आणि असं हे बेलाचे झाड जर तुमच्या घराजवळ गावांमध्ये शहरांमध्ये असेल तर या झाडाखाली जाऊन हा उपाय आपण आवर्जून करा

खरंतर कोणत्याही देवीच्या मंदिराजवळ जर असं बेलपत्राचे झाड असेल तर ते अतिउत्तम राहील अन्यथा इतर कोणत्याही बेलपत्राच्या झाडाखाली आपण हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तसं तर आपली जे मनोकामना आहे ज्या प्रकारची आपल्या जीवनामध्ये अडचण आहे

त्या स्वरूपाचे उपाय आपण करावे जसं की जर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती खूप आजारी आहे अनेक वर्षांपासून आजारी आहे किंवा एका मागोमाग एक आजारी पडतात ही व्याधी हे आजारपण हटतच नाही अशावेळी बेलाच्या झाडाखाली

बेलाच्या बुंध्याला खोडाला या नवरात्रीतील कोणत्याही दिवशी अगदी थोडसं दूध गाईचं कच्च दूध गोमातेचे कच्चे दूध म्हणजे न तापवलेले दूध आपण मनोभावे अर्पण करून पहा आणि हात जोडून या बेल वृक्षास आपण प्रार्थना करा की हे आजारपण ही व्याधी दूर व्हावी

नवरात्रीमध्ये केलेला हा उपाय अगदी आश्चर्यकारकरीत्या घरातील आजारपण दूर करतो हा उपाय आजारी व्यक्तीने केल्यासाठी उत्तम आहे किंवा त्या व्यक्तीच्या वतीने घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते ज्यांच्या घरामध्ये गरिबी आहे दारिद्र्य आहे पैसा येत नाही

अशा लोकांनी गंगाजल घ्यावं जर गंगाजल नसेल तर कोणत्याही पवित्र नदीच आपण जल घ्यावं त्यामध्ये थोडासा सिंदूर म्हणजेच कुंकू टाकावं आणि असे हे कुंकू मिश्रित गंगाजल आपण या बेलपत्राच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि आपल्या घरातून अलक्ष्मी निघून जावी

आणि लक्ष्मीचा स्थायी वास चिरंतन वास निर्माण व्हावा अशी प्रार्थना आपण करायची आहे ज्यांच्या जीवनात दुर्भाग्याचा फेरा चालू आहे काहीही करायला जा त्यामध्ये चुकीच्याच गोष्टी घडतात जणू काही आपल्या पाठीमागे दुर्भाग्याचा फेरा लागलेला आहे नशीब साथ देत नाही

अशा लोकांनी थोडेसे तीळ सफेद रंगाचे तीळ या बेल वृक्षाला अर्पण करावेत आणि सौभाग्य प्राप्तीची प्रार्थना करावी हे तर झाले छोटे छोटे उपाय आता जाणून घेऊया की आध्यात्मिक उन्नती घडून आणणारा जो उपाय आहे किंवा ज्याच्यामुळे मनातील इच्छा लगोलग पूर्ण होतात

असा एक उपाय यासाठी आपण बेल वृक्षाची बेल वृक्षाचे कोणतेही पाणी घ्यायचं आहे त्या पानाला अर्थातच तीन दले असतात तीन पाने असतात या तिन्ही पानांवरती प्रत्येक पानावर एक एक अक्षर लिहायच आहे ऐ ऱ्हिम क्लीम या मंत्रामध्ये प्रत्यक्ष महालक्ष्मी महाकाली

आणि महा सरस्वती या त्रिदेवींचा वास आहे खरंतर जी बेलपत्र असतात बेलाची पान असतात या बेलाच्या पानांमध्येच या त्रिदेवी वास्तव्य करतात महालक्ष्मी महाकाली आणि महा सरस्वती आणि त्यांना प्रसन्न करणारा मंत्र हा आहे

हा मंत्र लिहिण्यासाठी आपण कुंकवाचा वापर करणार आहोत कुंकवामध्ये थोडंसं पाणी टाका त्याचा घट्ट असा घोळ बनवा आणि त्याच्या मदतीने हे एक एक अक्षर प्रत्येक पानावर लिहायचं आहे अशाप्रकारे हे जे पान आपण लिहिलेलं आहे

हे पान माता राणीच्या चरणांची आपण अर्पण करायचं आहे कोणतीही देवता असू द्या कोणतीही देवी असू द्या अगदी माता पार्वती असू द्या माता लक्ष्मी असू देत माता दुर्गा असू देत कोणत्याही देवीच्या चरणी आपल्या गावात जी देवी आहे किंवा प्रत्येक गावामध्ये लक्ष्मी आईचं देऊळ असतं

त्या देवळामध्ये जाऊन आपण हे एक पान त्या ठिकाणी अर्पण करा आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती त्या ठिकाणी बोलून दाखवा कोणत्याही स्वरूपाची मनोकामना अगदी लगोलग या उपायाने पूर्ण होते अजून एक गोष्ट ज्यांच्या पाठीमागे साडेसाती चालू आहे

शनीची साडेसाती त्यांना सतत काही ना काही अडचणी येतात कोणत्याही कामांमध्ये काम कधीच पुर्णत्वास जात नाही किंवा राहूची पीडा आहे सतत अपघात होतात अकाल मृत्यूचे भय वाटतं जसे की शॉक लागून किंवा रस्त्यावरती अपघात होऊन खाली पडण्याची भीती वाटते

तर हे जे अकाल मृत्यूचे भय आहे केव्हा साडेसाती चालू आहे कोणतीच कामे पूर्ण होत नाहीत किंवा जर रक्तविकार असतील रक्ता विषयी काही आजार असतील तर या सर्वांसाठी एक छोटासा उपाय आपण करू शकता या नवरात्रीतील कोणत्याही दिवशी आपण एक तांब्याची रिंग घ्यायची आहे

रिंग म्हणजे अंगठी तांबे या धातूपासून बनलेली अंगठी आणि या बेलवृक्षाच्या बुंध्याशी म्हणजे खोडाजवळ चार बोटांनी इतका खड्डा आपण खोदायचा आहे आणि या खड्ड्यांमध्ये आपण ही अंगठी गाढायची आहे

आता ही अंगठी गाढल्यानंतर मनोभावे हात जोडून तुमची जी समस्या आहे समजा रक्त विकार आहेत रक्ताच्या काही आजार आहे शनीची ची साडेसाती पनौती चालू आहे राहुच्या पीडा आहेत आकाल मृत्यूचे भय वाटतं तर या समस्या दूर करण्याची प्रार्थना आपण या बेलवृक्षास करायची आहे

आणि त्यानंतर हा खड्डा आपण त्यामध्ये माती टाकून ते रिंग गाढायची आहे आणि जेव्हा नवरात्र संपतील नवरात्र संपल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी आपण तिथं जायचं आहे आणि ती रिंग त्या ठिकाणाहून बाहेर काढायची आहे आणि स्वच्छ करून स्वतःच्या बोटांमध्ये ती परिधान करायची आहे

जोपर्यंत ही रिंग तुमच्या जवळ असेल ही अंगठी तुमच्याजवळ असेल याचं कारण काय तर नवरात्रीमध्ये चल अचल वस्तूंमध्ये सुद्धा एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण होतं ऊर्जा निर्माण होते आणि म्हणून हे जे बेलाचे झाड आहे या बेलाच्या झाडातील प्रचंड ऊर्जा या तांब्याच्या रिंगमध्ये अंगठीमध्ये समाविष्ट होते

आणि या ऊर्जेचा वापर आपल्याला राहू किंवा शनीच्या पिडेपासून वाचवतो अकाल मृत्यूचे भय आपल्याला राहत नाही तर या नवरात्रीमध्ये बेलाच्या वृक्षाशी संबंधित बेलाच्या झाडाशी संबंधित हे काही छोटे छोटे उपाय आपण अगदी आवर्जून करून पहा

माता राणीच्या कृपेने जगत जननी जगदंबेच्या कृपेने आपल्या सर्वांना सुख सौभाग्य आणि धनसंपत्ती लाभो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते

तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *