आज पुन्हा एकदा खूप छान असा स्वामी अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा अनुभव काकांनी त्यांच्या मुलीसोबत एक्झाम देताना आलेला स्वामींचा अनुभव आपल्या सर्वांसोबत शेअर केला आहे ते सांगतात माझी मुलगी सी ए ची एक्झाम देत होती तिला बालवर्ग ते अगदी बारावीपर्यंत मार्क्स 90 प्लस मिळायचे पण यावेळी काही वेगळच घडलं तिची सी ए ची फायनल एक्झाम झाली पण त्या एक्झाम मध्ये ती फेल झाली तिने ते खूप मनावर घेतलं तिने आतापर्यंत कधीच अपयश पाहिलं नव्हतं

आमच्या घरातच स्वामींच्या पादुका आहेत छोटासा हॉलमध्ये मठ आहे इथे सर्वजण आरतीला पाया पडायला येतात माझ्या मुलीला अपयश आले म्हणून तिने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलं ती या अपयशामुळे खूप डिस्टर्ब झाली होती तिने स्वतःला कोंडून घेतल्यामुळे मी तिला रूम मधून बाहेर काढले आणि स्वामींच्या फोटो समोर येऊन उभे केले तिला मी अजून एकदा एक्झामसाठी तयारी कर असे सांगितले तर ती हो म्हणाली आणि नेक्स्ट टाईम तिने पुन्हा एकदा सी ए ची एक्झाम दिली

पण यावेळी सुद्धा ती फेल झाली ती फक्त एक किंवा दोन मार्क्सने फेल होत होती ती खूप अस्वस्थ झाली होती ती फार हळवी होती ती म्हणाली पप्पा मी यापुढे सीए एक्झाम तोंड सुद्धा बघणार नाही तिने हे अपयश खूप मनावर लावून घेतलं नंतर मी तिला परत एकदा स्वामींच्या समोर उभ केलं आणि म्हणालो की बेटा तू हे सगळं डोक्यावरून काढून टाक म्हणजे मी सी ए च परत एक्झाम देणार नाही सगळं विसर हे बघ तुला स्वामींना काहीतरी वेगळं द्यायचं असेल त्यांना तुला एक मार्क्स किंवा काठावरती पास करायचं नसेल

तर तू आता शेवटचा एक प्रयत्न कर ती त्यावर बोलली ठीक आहे पप्पा मी लास्ट प्रयत्न करेन ती नोकिया मध्ये सर्विसला होती तिने सी ए एक्झामच्या वेळी 21 दिवस सुट्टी घेतली ती 24 तासांपैकी 20 तास अभ्यास करायची उरलेले फक्त चार तास झोपायची रोज सकाळी ती चार वाजता उठायची मी तिला बोलायचो की एवढं का तू मनावर घेतले तर ती बोलायची नाही पप्पा तुम्ही बोललात ना की स्वामींना काहीतरी वेगळं द्यायचं आहे तर मी खूप मेहनत करणार तसं तिने 20 दिवस सतत अभ्यास केला

नंतर तिची एक्झाम सुरू झाली आम्हाला टेन्शन आले की हिला परीक्षेच्या वेळी चक्कर वगैरे आली तर डोकं दुखलं तर मी चिंतेत होतो म्हणून आम्ही तिला विकनेस येऊ नये म्हणून कोकम सरबत आवळा सरबत लिंबू सरबत ची बॉटल द्यायचो तिचे मालाडला सेंटर होतं त्यावेळी सी ए चे सकाळी एक संध्याकाळी एक असे टोटल नऊ पेपर होते तर ते पाच ते सहा दिवसात संपायचे तिला आम्ही सेंटरवर सोडायला जायचो आणि संध्याकाळी तिच्या सोबत घरी यायचो त्याला आम्ही दोन्ही सी ए एक्झाम च्या वेळी विचारलं होतं की कसे गेले पेपर

पण यावेळी मी आणि माझ्या पत्नीने तिला विचारलं नाही ती आधीच टेन्शनमध्ये होती म्हणून आम्ही तिला विचारलं नाही मग तिची एक्झाम संपली ती परत कामाला जॉईन झाली नंतर तिचा इंटरनेट वरती रिझल्ट लागला आम्ही खूप घाबरलो होतो पण आमचा स्वामींवर विश्वास होता नक्की चांगलंच होणार ही आमची आशा होती ती दोन वाजता नेट वरती चेक करत होती आणि एक थोड्या वेळाने आम्हाला तिने कॉल केला आणि खूप फोनवर रडायला लागली आम्ही घाबरलो टेन्शनमध्ये आलो

तर ती बोलली पप्पा मी पास झाली आहे मेरिटमध्ये आली आहे आम्ही हे ऐकून खुश झालो तिला तब्बल 40 मार्क्स जास्त पडले होते ती घरी आली काही दिवसानंतर आमच्याकडे गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम होता तेव्हा आम्ही लहान मुलांना दोन मिनिटं कोणता तरी विषय देऊन बोलायला सांगितलं ती कामावरून संध्याकाळी घरी आली आणि तशीच ती तो कार्यक्रम चालू होता तेव्हा ती ऐकत बसली होती त्यावेळी तिचं लग्नही ठरलं होतं जो मुलगा तिच्या सोबत लग्न करणार होता तो मुलगा फर्स्ट अटेम मध्ये सी ए पास झालेला आणि ऑल इंडिया मध्ये सहाव्या नंबरला रँक मध्ये आलेला

ती कार्यक्रम मध्ये बसली असता तिलाही आम्ही कुठल्याही विषयावर बोल असे सांगितले तर तेव्हा तिने तिचा स्वामी अनुभव सर्वांना सांगितला की सी ए एक्झामच्या वेळी तिच्यासोबत नक्की काय घडलं होतं ते तिने सांगितले माझं लग्न ठरलं तुम्ही आता किती वर्षांपासून इथे स्वामींच्या दर्शनासाठी येताय आपण याआधी सुद्धा खूप कार्यक्रम स्वामीं समोर साजरे केले आहेत स्वामींना यापुढे कधीही विसरू नका तुम्ही नेहमी इथे येत जा इथे कोणाला बंधन नाही इथे सगळे माझ्या आई-बाबांना सारखेच आहेत

तिने सांगितले की मी दोनदा सी ए फेल झाली आहे आई वडील म्हणाले की स्वामींना तुला काहीतरी वेगळं द्यायचं असेल तू एकदा प्रयत्न कर म्हणून मी थर्ड टाइम परत सी ए ला बसले जेव्हा मी पेपर द्यायला गेले पहिला पेपर त्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर द्यायला सुरुवात केली त्या प्रश्नाचे उत्तराचं पान माझ्यासमोर उघड व्हायचं मला तसं दिसायचं सगळ्या प्रश्नांची उत्तरे अक्षरशः पान उघड करून यायची असं कसं मी विचार करायला लागले असे एक नाही दोन नाही तर नऊच्या नऊ पेपरला माझ्यासोबत झालं

मला पण समजेना की हे सगळं कसं काय होते तर मी अक्षरशः कॉपी करून लिहायचे असं मला वाटायचं तर माझ्याच बाबतीत आई-वडिलांची पुण्याई असेल माझे पण भक्ती असेल जर मी एक दोन गुणांसाठी झगडत होते तर मला 40 मार्क्स जास्त पडले प्रत्येक गोष्टी मागे महाराजांचे नक्कीच काही ना काही नियोजन असते महाराज सगळ्या गोष्टी योग्य वेळ आली की करतात तर देवावरती असावी श्रद्धा नसावी अंधश्रद्धा प्रसन्नतेसाठी करावी ध्यानसाधना

तुमचा देवावर विश्वास आहे की नाही हे नाही माहिती पण माझ्याच एका परिचयातील व्यक्तींनी देवाप्रती प्रचिती कशा पद्धतीने झाली याबद्दल माझ्याकडे सांगितलेला अनुभव मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *