बऱ्याच वेळा असे होते की आपल्याला भूक लागलेली असते असे वाटते की आपण जेवण करू पण खाल्ले जात नाही किंवा याच्या अपोजिट बऱ्याच वेळेला असे देखील होते बरेच पदार्थ समोर असल्यावर देखील खाण्याची इच्छा होत नाही भूक लागत नाही जर तुम्हाला भूक लागत नसेल

जर तुम्हाला भूक लागत नसेल किंवा भूक असूनही जेवण जात नसेल तर अशा समस्यांपासून सुटका करून भूक वाढवणारा घरगुती नॅचरल उपाय आज आपण जाणून घेणार आहोत आणि हा जो उपाय आहे तो आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना करू शकतो यापासून कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट न होता पूर्णपणे फायदाच होतो

तरी यासाठी आपल्याला लागणार आहे आले तर आल्या मध्ये विटामिन सी कॅल्शियम फॉस्फरस आयरन झिंक कॉपर मॅगनीज अशी बरीच पोषक तत्व असतात ज्यामुळे आपली भूक तर वाढतेच परंतु यामुळे पोटाचे काही विकार असतील आणि यामुळे जर तुम्हाला भूक लागत नसेल तर हे विकार सुद्धा या उपायांमुळे बरे होती तर आल्याचा साधारण दहा एक इंचाचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याची साल काढून घ्यायचे आहे

नंतर ते आले किसून घ्यायचा आहे किसलेले आले एका वाटीमध्ये कॉटनच्या कापडात किंवा जाळीच्या कापडात घालून घ्यायचे आहे आणि याचा रस काढून घ्यायचा एका वेळेस फक्त एक चमचाभर रस काढायचा आहे नंतर साखर घ्यायची आहे फक्त अर्धा चमचा साखर या मिश्रणामध्ये टाकायचे आहे

जर हा उपाय शुगरचा पेशंटसाठी असेल म्हणजे तुम्हाला डायबिटीज असेल तर या ठिकाणी तुम्ही साखर न वापरता सेंदवमिठ म्हणजेच लाहोरी मीठ म्हणजेच उपवासाचे मिठी जे आहे या मिठाचा आपण आपल्या चवीनुसार वापर करू शकता आणि हे मीठ नसेल तर तुम्ही काळ्या मिठाचा देखील वापर करू शकता

नंतर ते चमचा म्हणजे पळीमध्ये हे सगळे मिश्रण काढून घेऊन ते मंद आचेवर गॅसवर गरम करायचे आहे तोपर्यंत जोपर्यंत साखर वितळत नाही साखर वितल्यानंतर हे मिश्रण एका वाटीमध्ये काढून घ्या व हे तयार झालेले मिश्रण जेवणाआधी एक चमचा एक वेळेस सकाळी जेवणाआधी एक चमचा आणि संध्याकाळी जेवणाआधी एक चमचा असे घ्यायचे आहे

हे मिश्रण जेवणाच्या किमान एक तास आधी तयार करून प्यायचे आहेत यामुळे भूक सुद्धा सहज वाढते आणि खाण्याची इच्छा नसेल तरीसुद्धा जेवण आपल्याला व्यवस्थित आपण खाऊ शकतो आणि असे हे मिश्रण तुम्ही एका वेळेस जास्त प्रमाणात तयार करून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवले तरी चालेल म्हणजे ज्या वेळेत आपल्याला हे मिश्रण हवे आहे त्या वेळेस आपण हे मिश्रण घेऊ शकतो आणि हा उपाय किमान सात दिवस आपण कंटिन्यू करायचा आहे

Leave a Reply

Your email address will not be published.