श्री स्वामी समर्थ वर्षातून किती वेळेस आपल्या कुलदेवीची किंवा अन्य देवींची ओटी भरावी. कोणी भरावी कुठे भरावी नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे मित्रांनो देवीची ओटी भरणं तेवढंच गरजेचे आहे जेवढं देवीचं दर्शन करणं म्हणून सगळ्यांनी देवीची ओटी नक्की भरावी पण प्रश्न पडतो की देवीची ओटी केव्हा भरावी आणि कुठे भरावी तर मित्रांनो देवीची ओटी आपण देवीचे जे स्थान आहे जे मंदिर आहे तिथे जाऊन भरली तर अति उत्तम मानलं जातं

पण आपण घरी सुद्धा देवीची ओटी भरू शकतो त्यात काही वाद नाही घरी भरली तरी चालते पण जेव्हा तुमचं जाणं होतं दर्शनानिमित्त तेव्हा तुम्ही तिथे जाऊन देवीची ओटी नक्की भरावी आणि जर तुमचे जाणं होत नाहीये तर तुम्ही घरीच देवीची ओटी भरावी घरी तुमच्या कुलदेवीची मूर्ती कुलदेवीचा फोटो असेल तर त्यासमोर तुम्ही ती ओटी भरू शकतात आणि मूर्ती फोटो नसेल तर तो फोटो आपल्या घरात नक्की ठेवावा आणि जर कोणत्याही देवीची मूर्ती फोटो घरात नाहीये तर लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा लक्ष्मी मातेचा फोटो तर असेलच तर लक्ष्मीची ओटी भरली तरी चालते

आता ओटी केव्हा भरावी तर मित्रांनो ओटी ही देवीचा खास महत्त्वाचा दिवस जेव्हा असतो तेव्हा तुम्ही ती ओटी भरू शकतात जसं वर्षातून दोन नवरात्री येतात एक चैत्र नवरात्र येते आणि एक शारदीय नवरात्री येते तर या दोन नवरात्राचे नऊ नऊ दिवस असतात तर त्या नऊ दिवसांमध्ये आपण केव्हाही देवीची ओटी भरू शकतो किंवा घरात काहीतरी शुभ गोष्टी घडतील तेव्हा सुद्धा आपण देवीची ओटी भरू शकतो

जसं  कोणाचे लग्न असेल लग्नकार्य असेल तेव्हा घरीच देवीला निमंत्रण देऊन आपण ओटी भरावी ते सुद्धा करता येते किंवा दिवाळीच्या वेळेस कोणता सणवार असेल तेव्हा सुद्धा तुम्ही ओटी भरू शकतात किंवा काहीतरी खूप मोठी इच्छा तुमची पूर्ण झाली नोकरी लागली किंवा बिजनेस सुरू झाला किंवा काहीतरी प्रॉपर्टी झाली घराचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं तेव्हा सुद्धा आपण देवीची ओटी भरू शकतो आणि ही ओटी घरीच भरावी

फक्त एक साडी नारळ आणि गहू किंवा तांदूळ लागतात हे सगळं देवीसमोर ठेवायचे असतात आणि नंतर ओटीतला सामान ज्या स्त्रीने ओटी भरलेली आहे त्याच स्त्रीने वापरायला घ्यायचा असतो आता ओटी कोणी भरायची तर ओटी ही फक्त विवाहित महिलांनीच भरायची असते इतर कोणीही ओटी भरू नये

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *