महाभारतामध्ये जेवण करण्याविषयीचे काही नियम सांगण्यात आले आहेत जे व्यक्ती जेवण करताना या नियमांचे पालन करतात त्यांना आरोग्याबरोबरच सुख समृद्धी आणि संपत्तीची ही प्राप्ती होते शास्त्रामध्ये दिलेले हे नियम वैज्ञानिक दृष्टीने ही परिपूर्ण आहेत अशा प्रकारे भोजन केल्यास मनुष्याला सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून आपण ही भोजन करताना या नियमांचे पालन जरूर करावे चला तर जाणून घेऊयात भोजन करण्याचे काही नियम स्वयंपाक घरात भरभराट राहावी

देवी अन्नपूर्णेचा आपल्यावर आशीर्वाद राहावा तसेच घरात कधीही धनधान्याची कमतरता असू नये अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते यासाठी आहार ग्रहण करण्यापूर्वी आहार ग्रहण करताना तसेच जेवण झाल्यानंतर नेमके काय करावे याविषयी शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत या नियमांचे पालन आपण भोजन करताना जर केले तर आपल्या घरात बरकत येते जेवण करायला बसण्यापूर्वी सर्वात आधी आपले दोन्ही हात दोन्ही पाय व मुख अशा पाच अंगांना धुवून स्वच्छ करावे त्यानंतरच जेवणाला बसावे जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी देवी-देवतांचे आवाहन जरूर करावे

भोजन नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे मुख करूनच ग्रहण करावे भोजनाचे ताट नेहमी चटई चौरंग किंवा पाटावर सन्मानाने ठेवावे आणि त्यानंतर भोजनाला सुरुवात करावी जेवण करताना शक्यतो मौन पाळावे बडबड करत गप्पा मारत भोजन करू नये तसेच रागारागाने आणि संताप करूनही भोजन करू नये जेवण करताना शांततेने आरामात जेवण करावे जेवताना तोंडाने चित्र विचित्र आवाज काढू नयेत दिवसातून निदान एक वेळा तरी कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत बसून जेवण करावे कधीही पायात चपला बूट घालून जेवण करू नये

उष्ट्या खरकट्या हाताने कधीही अग्नीला स्पर्श करू नये शक्यतो जेवण स्वयंपाक घरात बसूनच करावे यामुळे आपल्या कुंडलीतील राहू ग्रह शांत होतो जेवणाचे ताट कधीही एका हाताने धरून मग जेवण करू नये यामुळे आपले भोजन हे प्रेतयोनीत जाते भोजन केल्यानंतर कधीही ताटात हात धुवून नये आपल्यासमोर आलेल्या अन्नाला नावे न ठेवता गुपचूप पणे जेवण करावे ताटात दिलेले संपूर्ण अन्न संपवावे ताटात उष्टे सोडू नये रात्री जेवण झाल्यानंतर उष्टी खरकटी भांडी तशीच घरात पडू देऊ नयेत ती लगेचच स्वच्छ करावीत

जेवण झाल्यानंतर आपले ताट नेहमी योग्य ठिकाणी ठेवावे उष्टे ताट कधीही किचन वर पलंगावर टेबलावर किंवा टेबलाखाली ठेवू नये रात्रीच्या वेळी तांदूळ दही किंवा सातूचे सेवन केल्यास देवी लक्ष्मीचा अपमान होतो म्हणून रात्रीच्या वेळी या वस्तूंचे सेवन करणे टाळावे जेवणाला बसण्यापूर्वी सर्व प्राणिमात्रांना भोजन मिळावे अशी भगवंतांकडे प्रार्थना करावी व त्यानंतरच जेवणाला सुरुवात करावी स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीने किंवा व्यक्तीने सर्वात आधी स्नान करून सुचिर्भूत होऊन मगच स्वयंपाकाला सुरुवात करावी स्वयंपाक झाल्यानंतर सर्वात आधी एक पोळी गाईला

एक पोळी कुत्र्याला व एक पोळी कावळ्यांना टाकावी अग्निदेवतेला नैवेद्य अर्पण करून मगच घरातील सर्वांनी भोजन करावे घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून भोजन करावे यामुळे त्यांच्यातील परस्पर प्रेमभाव वाढीस लागतो घरातील सर्वांनी वेगवेगळे बसून भोजन केल्यास त्यांच्यातील प्रेमभाव कमी होतो दक्षिण दिशेला मुख करून भोजन केल्यास ते भोजन राक्षसांना मिळते तर पश्चिम दिशेला मुख करून भोजन केल्यास आपल्याला रोग जडतात जेवण कधीही पलंगावर केव्हा सोप्यावर बसून करू नये तसेच तुटलेल्या चिरा गेलेल्या भांड्यांमध्येही कधीही जेवण करू नये

खूप गोंधळ गोंगाट असलेल्या ठिकाणी कधीही जेवण करू नये तसेच पिंपळाच्या आणि वडाच्या झाडाखाली बसूनही कधीच जेवण करू नये उभे राहून जेवण करणे ही अनुचित समजले जाते आजकाल तर बफे पद्धत निघालेली असल्याने या नियमाला तर अगदी पायदळी तुडविले जाते खूप तिखट किंवा अति आंबट अति गोड असे जेवण बनवू नये कोणी उष्टे सोडलेले अन्न कधीही खाऊ नये जेवण करताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी व संकटांवर चर्चा करू नये जर बोलायचेच असेल तर चांगले व सकारात्मक बोलावे

जेवण करताना सर्वात आधी गोड त्यानंतर खारट आणि त्यानंतर कडू जेवण करावे जेवण झाल्यानंतर लगेचच पाणी किंवा चहा घेऊ नये भोजन झाल्यानंतर कमीत कमी 100 पाऊले तरी चालावेत जेवण झाल्यानंतर एका तासानंतर साखर घातलेले दूध किंवा एखादे फळ खाल्ल्यास भोजन पचायला मदत होते भीष्मपितामहानी महाभारतात सांगितले आहे की ज्या ताटाला कोणाच्या पायाचा स्पर्श झाला असेल अशा ताटातील बहुजन कधीही खाऊ नये ताटात जर जेवण करताना जर एखादा केस निघाला तर ते ताट तसेच टाकून द्यावे

ताटातील केस काढून जर ते अन्न तसेच खाल्ले गेले तर आपल्याला दारिद्र्याचा सामना करावा लागतो जेवण करण्यापूर्वी जर ताटाला कोणी ओलांडले असेल तर अशा ताटातही भोजन कधीच करू नये भीष्म पितामहा म्हणतात की एकाच ताटात दोन भावांनी जेवण केल्यास ते ताट अमृता समान बनते अशा भोजनामुळे धनधान्य आरोग्य आणि लक्ष्मीची प्राप्ती होते भीष्म पितामहा यांच्यानुसार पती-पत्नींनी कधीही एकाच ताटात जेवण करू नये जर पती-पत्नीने एकाच ताटात जेवण केले तर ते ताट मादक पदार्थांनी भरलेले ताट बनते

लग्नापूर्वी मुलीने व वडिलांनी एका ताटात जेवण केल्यास वडिलांच्या आयुष्यात वृद्धी होते या आहेत त्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या जेवण करताना सर्वांनी लक्षात ठेवाव्यात व त्याप्रमाणे जेवणाचे नियम पाळावेत

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *