श्रीमंत होणं कुणाला आवडत नाही. किंबहुना प्रत्येकालाच श्रीमंत व्हायचं असतं, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नही केले जातात.
मात्र तरिही शहरात आपल्याला श्रीमंत, मध्यमर्गीय आणि गरीब हा भेद दिसतोच.
मुंबईसारख्या मायानगरीत अंबानी, बच्चन यांचे आलिशान बंगले आहेत, उच्चभ्रु सोसायटी आहे, तर त्याचवेळी लालबाग, परळ हे भाग चाळींनीही वेढलेले दिसतात.
त्यामुळे गाव असो वा खेडी, गरीब आणि श्रीमंत यांचे समान प्रमाण हमखास दिसतंच.
भारतात अनेक गावं-खेडी आहेत. आपल्या देशाला निसर्गाचा एक अनमोल वारसा या गावांच्या माध्यमातून मिळाला आहे. गावं म्हटल की आपल्या डोळ्यासमोर एकच चित्रच उभं राहतं, ते म्हणजे शेत, मातीची कवलारू घरे आणि गावातील लोकांचं ते साधारण राहणीमान.
अशीच परिभाषा आपण गावांची करतो.. नाही का? पण आपल्या देशात एक असे गाव देखील आहे जे शहरांना देखील टक्कर देईल.
गाव म्हणजे गुजरात येथील बल्दिया गाव. हे गुजरातच्या कच्छ परिसरात आहे.
बल्दिया या गावाला करोडपतींचे गाव म्हटल्या जाते. एकीकडे आपण गावातल्या लोकांना गरीब आणि साधारण समजतो, तर दुसरीकडे या गावातील सर्व लोकं करोडपती बनले आहेत. या लोकांची समृद्धी बघून तुमचे डोळे विस्फारून जातील.
हे गाव अनेक शहरांपेक्षा चांगले असल्याचं सांगितल्या जाते. येथे मोठे सुंदर घरं आणि अनेक अश्या सुविधा उपलब्ध आहेत ज्या कुठल्या मोठ्या शहरात असतात.
या गावातील लोकांचे बँक अकाउंटमध्ये अब्जो रुपये जमा असल्याचे सांगितल्या जाते. मागील दोन वर्षांत या गावातील बँकेत दीड हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. एवढच नाही तर येथील डाकघरात देखील ५०० कोटी पेक्षा अधिक पैसे जमा आहेत.
तसे तर गुजरातमध्ये अनेक गावं आहेत जी समृद्ध आहेत. यामध्ये बल्दिया जवळील माधापूर देखील येते. या गावात नऊ बँकांच्या शाखा आहेत आणि अनेक एटीएम लावण्यात आले आहेत. या गावातील रहिवाशी बहुतेक पटेल समाजातील आहेत.
माधापूर गावाचे प्रमुख सांगतात की,
‘आर्थिक रूपाने संपन्न असल्या कारणाने येथील ग्रामीण कुटुंब विदेशात देखील राहतात. दरवर्षी सुट्टीत ते गावात राहायला येतात. पैसे कमविण्याकरिता विदेशात आपले जीवन घालविल्यानंतर ते गावात परततात. म्हणून या गावात रिटायर्ड वृद्धच जास्त दिसतील. या गावात तरुण खूप कमी बघायला मिळतात.’
गुजरातच्या या करोडपती गावांतील लोकांनी शंभर वर्षांआधी पैसे कमविण्यासाठी विदेशाकडे प्रस्थान केले होते. त्यानंतर हे लोकं व्यवसाय इत्यादींनी समृद्ध/संपन्न झाले आणि विदेशातून परत येऊन पुन्हा आपल्या गावात राहायला लागले.